…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचं लक्षण नाही, हा उठावडेपणा आहे- एकनाथ खडसे
मुंबई | जळगावमधील आशादीप वसतीगृहात पोलिसांनी महिलांना नग्न करुन नृत्य करायला लावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी झालेल्या चौकशीतून ही प्रकार खोटा असल्याचं समोर आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. मात्र या मुद्द्यावरून भाजपने सरकारवर सडकून केली. आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी झाली. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते. या आरोपांमुळे जळगावाची बदनामी झाली, असं एकनाथ खडसे म्हणाले.
आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सर्व माहिती घेऊनच यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 4 मार्च रोजी या प्रकरणाचा चौकशी अहवाल विधानसभेत मांडला. या वसतीगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा त्रास होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला. याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असं अनिल देशमुखांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा
रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा
शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत
बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत
कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ
Comments are closed.