जळगाव | पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीच्या एकीचे हे प्रदर्शन झाले आहे. भाजपचे नेतृत्व कमी झाले आहे. पक्षात हम करे सो कायदा होता, म्हणून हा पराभव झाला, अशी टीका खडसेंनी केलीये. तेेेे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे. असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात, असा टोला खडसेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही”
“संयम, शिस्त दाखवली हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे”
‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा’; सोलापुरच्या शिक्षकाचं तुकाराम मुंढेंकडून कौतुक
14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!
“हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती”