“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”
मुंबई | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. त्या जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पाळणा हलला. मात्र, अद्यापही इतर मंत्र्यांचा पाळणा हललेला नाही. डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधलाय.
दरम्यान, अनेक बंडखोर मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. पण, आता सेना भवनातून काहीही ठरत नाही, दिल्लीला जाऊन परवानगी आणावी लागते, असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई
शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
“शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं”
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर
मोठी बातमी! बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
Comments are closed.