नाशिक | माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचं काम मी सुरु करणार आहे, असा इशारा एकनाथ खडसेंनी दिलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते.
गेले चार वर्षे मी भीतीच्या छायेखाली वावरत होतो. कधी माझ्या मागे ईडी लागेल, कधी अँटी करप्शन लागेल. कधी विनयभंगासारखी केस दाखल केली जाईल, याची नेहमी भीती असायची. मात्र आता मी त्या केसमधून निर्दोष सुटलो आहे. विनयभंगासारख्या खटल्यातूनही बाहेर आलो आहे, असं खडसेंनी सांगितलं आहे.
या सर्वातून बाहेर आल्याने माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. आता एनसीपीत आलो. त्यामुळे आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी सुरु करणार आहे, असा इशारा खडसेंनी भाजपला दिलाय.
दरम्यान, पक्ष बंदी कायद्यामुळे अनेक जण अडचणी आहेत. मला साधा कार्यकर्ता म्हणून काम करायला मला आवडेल, असंही एकनाथ खडसे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
महिलेने वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून लगावली कानशिलात; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हे वर्ष आमचं नव्हतंच, संघाला नशिबाची साथ देखील मिळाली नाही- धोनी
जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही- मेहबुबा मुफ्ती
देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण!
Comments are closed.