Top News

“महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवलेला”

जळगाव | महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार रिक्षा म्हणून भाजपचे नेते टीका करतात. मग, अटलजींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला होता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणालेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय बैठकीत बोलत होते.

अनेकांनी मला विचारणा का केली, की तुम्ही राष्ट्रवादी का निवडली? बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम शरद पवार यांनी केलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो, असं खडसेंनी सांगितलं.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्याचे काम शरद पवारांनी केलं. हे कधीही न होण्यासारखं काम होतं. ते पवारांनी शक्य केलं, असं खडसे म्हणाले.

भाजप मी सोडली नाही तर मला भाजपने बाहेर ढकलले. मागच्या काळात माझा अपमान झाला, डावलले गेले, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ नावं संपुष्टात येणार; ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार!

सर्वसामान्य नागरिकांआधी नेत्यांना कोरोना लस द्या; शिवसेना नेत्याची मागणी

…तर अमित शहांची देखील काॅलर धरु; राजू शेट्टींचा इशारा

“भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत”

“…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या