Top News

मी कोअर कमिटीत होतो, आता काढलं असेल तर माहिती नाही- एकनाथ खडसे

मुंबई | मी कोअर कमिटीत होतो. मात्र सध्या कोअर कमिटीच्या बैठकांना आमंत्रण येत नाही. त्यामुळे कोअर कमिटीतून मला काढलं असेल तर माहिती नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. तब्बल दोन ते अडीच तास ही चर्चा सुरु होती. यानंतर एकनाथ खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची चर्चा पंकजा मुंडे यांच्याशी करण्याची गरज नाही. माध्यमं सर्व दाखवत असतात. विनोद तावडेंना माझी मनधरणी करण्याची जबाबदारी दिली आहे की नाही याविषयी मला माहिती नाही, असंही खडसेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, मी आजही पक्षातच असल्याने मनधरणी करण्याची गरज नाही. मी पूर्वीही पक्षात होतो, पक्षाचं नेतृत्व केलं आहे, असं खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या