जळगाव महाराष्ट्र

भाजप सोडताना एकनाथ खडसे आक्रमक; देवेंद्र फडणवीसांवर केले ‘हे’ धक्कादायक आरोप

जळगाव | 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मला खूप छळलं, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला, असा गंभीर आरोप खडसेंनी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

छळाला मर्यादा नव्हत्या, पण मी सहन केलं, भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती तरीही माझा राजीनामा घेतला, असं खडसेंनी सांगितलं.

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणालेत.

भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला, असं खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार- जयंत पाटील

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर…- बच्चू कड

…म्हणून अजित पवारांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला रद्द

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार- उद्धव ठाकरे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या