बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेवल्याशिवाय जाऊ नका”, खडसेंचा आग्रह; फडणवीस म्हणाले…

जळगाव | जळगाव दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या घरी भेट दिली. यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचा जळगाव दौरा आणि आपली पवार भेट हा निव्वल योगायोग होता. तसेच मी देवेंद्र फडणवीसांना जेवण करुन जा, अशी विनंती केल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर असताना फडणवीस चहापानासाठी खडसेंच्या नितळीतील घरी गेले. त्यावेळी एकनाथ खडसे घरी उपस्थित नव्हते. मात्र भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फडणवीस आणि खडसेंचं बोलणं करुन दिलं होतं.

मी मुंबईत आहे. आमच्या घरी आपलं स्वागत आहे. पण मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका, असा आग्रह फडणवीसांना केला. त्यावेळी फडणवीसांनी नुकसानाची पाहणी करण्यासाठी आपल्या भागात आलोय. माझे पुढचे कार्यक्रम नियोजित आहेत. मात्र, पुढच्यावेळी आलो की नक्की जेवण करेन असं म्हणाल्याचं खडसेंनी सांगितलं.

दरम्यान, फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगरला माझ्या घरी येणे आणि मी पवारांना भेटण्यासाठी जाणं हा योगायोग होता. पवार साहेबांची भेट ही नियोजित होती, असं खडसेंनी स्पष्ट  केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘आयुर्वेदिक उपचार करताना एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही’; भारतीय आयुर्वेद संस्थेचा दावा

“मी 39 वर्ष शिवसेनेत होतो, मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे मला माहितीये”

चिमुकल्याचं 90% फुफ्फुस खराब झालं; सिटी स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण

“2 ते 18 वयाच्या मुलांवर लसीकरण हे नरसंहार आहे”

एअर होस्टेसच्या पुस्तकानं जगभरात खळबळ, सांगितले अब्जाधीशांचे चाळे!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More