जळगाव महाराष्ट्र

“…तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही”

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी खडसेंनी कार्यालयात प्रवेश करताच खडसे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.

आज दसरा आहे. वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाने मात करण्याचा दिवस आहे. यापुढे आपणही समाजातील वाईट प्रवृत्तीविरोधात लढा द्यायचा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही, असा विश्वासही खडसेंनी व्यक्त केला.

दरम्यान, खडसे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आल्यानं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके मुख्यमंत्री कोत्या मनाचे नाही- संजय राऊत

आरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…

चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत

“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”

धक्कादायक! बिहार निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या