मुंबई | भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यावेळी बोलताना भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन, असं खडसे म्हणालेत.
मी आयुष्याची 40 वर्ष भाजपसाठी काम केलं. एकाएकी पक्ष सोडावा असं मला कधीच वाटलं नाही. विधानसभेत माझी खूप छळवणूक झाली, मानहानी झाली, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असं खडसेंनी म्हटलंय.
मी कोणता गैरव्यवहार केला असेल तर मला त्याची कागदपत्र दाखवा, परंतु या क्षणापर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही, असंही खडसेंनी सांगितलं.
मी कधीही महिलेला समोर ठेवून राजकारण केलं नाही. मी काही लेचापेचा नाही. मला जयंत पाटील म्हणाले होते की, माझ्यापाठी ईडी लावतील वगैरे. पण त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
‘काना मागून आला आणि तिखट झाला’; नाव न घेता जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!
पुण्यातील बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ!
Comments are closed.