सुनेला केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन, एकनाथ खडसे झाले भावूक, म्हणाले…

Raksha Khadse | महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळाले आहे. रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर त्या प्रायव्हेट विमानाने कुटुंबासह दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. आता रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांना आनंद झाला आहे.

रक्षा खडसेंना दिल्लीतून फोन येताच रावेरमध्ये मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. सुनेला मंत्रि‍पदाची संधी मिळत असल्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आनंद व्यक्त केला. परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद गगनाला भिडणारा आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे.

माझं हृदय भरून आलं- एकनाथ खडसे

रक्षा खडसे केंद्रात मंत्रिमंडळाची शपथ घेणार असल्याने माझं हृदय भरून आलं आहे. त्यांनी भाजपमध्ये आणि पक्षश्रेष्ठींवर निष्ठा ठेवली त्याचं हे फळ मिळालं आहे. माझ्याकडे आज बोलायला शब्द नाही मन भरुन आलं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

सलग तीन वेळा रक्षाताई रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यात त्यांनी अत्यंत चांगले काम केलेले आहे. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची तिसरी टर्मही चांगली राहील. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे रक्षाताई आज उच्चपदापर्यंत जाऊ शकल्या, असं खडसेंनी म्हटलंय.

Raksha Khadse | रक्षा खडसेंसह ‘या’ नेत्यांना मंत्रीपदाची संधी

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना लॉटरी लागली आहे.

आज संध्याकाळी 7. 15 मिनिटांनी एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला अवघे काही तास उरलेले असताना राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?; फायनल यादी आली समोर

मोठी बातमी! राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; हायअलर्ट जारी

“वादा तोच दादा नवा”; बारामतीत झळकले अजित पवारांना डिवचणारे बॅनर्स

“जो मराठा समाजाला त्रास देणार त्याला विधानसभेत…”, मनोज जरांगेंची तोफ कडाडली

“पुणेकरांना समुद्र नसल्याची खंत होती, म्हणून भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला”