मुंबई | एकनाथ खडसे यांनी आज अखेर शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
भाजप सोडण्यापूर्वी मी दिल्लीतल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. परंतु ते मला म्हणाले की, तुम्हाला आता पक्षात संधी नाही. तुम्हा राष्ट्रवादीत जा, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.
मी राजकारणात आल्यापासून संघर्ष करतोय. अगदी मला आमच्याच मंत्रिमंडळातही संघर्ष करावा लागला. परंतु मी कधीही द्वेषाची भावना ठेवली नाही. मी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, असंही खडसेंनी सांगितलं.
मी कोणता गैरव्यवहार केला असेल तर मला त्याची कागदपत्र दाखवा, पण या क्षणापर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही, असंही खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देऊ- शरद पवार
पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की…- एकनाथ खडसे
भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन- एकनाथ खडसे
IPL2020- आज मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज; चेन्नईसाठी ‘करो या मरो’ची लढाई
Comments are closed.