बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकनाथ खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या पातळीचे समजायचे मग पराभव का झाला?”

जळगाव | एकेकाळी भाजपच्या मातब्बर नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव घेतलं जायचं. पण भाजपमध्ये आपल्यावर अन्याय होतोय असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्यात आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आताही भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या लेवलचे समजत होते तर निवडणूकीत पराभव का झाला याचं खडसेंनी आत्मपरिक्षण करावं, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. तुम्ही काहीही केलं नसेल तर ईडीच्या कारवाईला सामोरं जा, ईडीला उत्तर द्या तुम्ही दोषी नसाल तर ईडी तुम्हाला वाजत गाजत घरापर्यंत सोडायला येईल, अशी खोचक टीका महाजन यांनी खडसे यांच्यावर केली आहे. परिणामी खडसे आणि महाजन वादाला तोंड फुटलं आहे.

जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपसोबत महाविकास आघाडीनं घात केल्याचं महाजन म्हणाले आहेत. भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. या मुद्द्यावरून भाजप आणि खडसे यांच्यात बराच वाद झाल्याचं पहायला मिळालं होतं. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन भाजपमध्ये असल्यापासून एकमेकांवर टीका करत असतात. आता दोन्ही नेते उघडपणे येथेच्छ टीका करताना पहायला मिळत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणूकीत एकनाथ खडसे यांना डावलून पक्षानं त्यांची कन्या जळगाव बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं होतं. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यावरून खडसे यांनी नाराज होऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.

थोडक्यात बातम्या 

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

कोरोना हा मोसमी आजार? वैज्ञानिकांच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More