बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंची तब्बल 9 तास ईडी चौकशी; चौकशीला खडसेंचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई | काही दिवसांपुर्वी राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती. मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना देखील गुरुवारी ईडीची नोटीस आल्यानं त्यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती.

ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर एकनाथ खडसे यांची ईडीने गुरुवारी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली आहे. सकाळी अकराला एकनाथ खडसे ईडी कार्यालयात आले होते. त्यानंतर खडसे रात्री आठ वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. या 9 तासात भोसरी भूखंड खरेदी विषयासंदर्भात अनेक प्रश्न खडसेंना विचारले गेल्याची माहिती समोर आली आहे. तर ईडीच्या चौकशीला त्यांनी पुर्ण सहकार्य केल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली आहे. ईडीने स्टेटमेंटसची सत्यता तपासली. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिली आहेत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असं एकनाथ खडसे यांनी ईडीला सांगितलं आहे.

दरम्यान, ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, तसंच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. खडसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे, असं खडसेंच्या वकिलांनी सांगितलं आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीला ‘आनंद पोटात मायेना’; शेअर केली खास पोस्ट!

देशात कोरोनाची तिसरी लाट???; या राज्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या 12,000 ने वाढली!

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

नवनीत राणांना आवरला नाही कैऱ्या खाण्याचा मोह, पाहा नेमका काय किस्सा घडला!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More