मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे ईडी कार्यालयात आज हजर राहणार असून त्यांची भोसरी येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
ईडीने खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविलं होतं. मात्र, त्यांना कोरोना संसर्ग रोगाची लागण झाल्यामुळं त्यांना १४ दिवसांनंतर चौकशीला बाेलावण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे आज सकळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती समोर येतं आहे.
ईडीनं पाठवलेल्या नोटीसबाबत विचारलं असता, माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे.
तसंच, हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन,अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली होती.
थोडक्यात बातम्या-
रेणू शर्माच नव्हे तर त्यांचा वकीलही वादग्रस्त; या गोष्टीमुळे अडचणी वाढणार?
भाजप नेत्यामुळे धनंजय मुंडेंना राजकीय जीवदान; राजीनामा देणार नाहीत?
धनंजय मुंडे प्रकरणात IPS विश्वास नांगरे पाटील ‘ॲक्शन मोड’मध्ये!!!
‘तीने मला घरी नेलं आणि माझ्यासोबत…’; मनसेच्या मनिष धुरींनी दिली धक्कादायक माहिती
प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे