बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) देखील उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र वेगळं असतं. गेल्या पाच सात वर्षात जे तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळालं ते मिळालं नसतं, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. तर यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पाहिजे, असं वक्तव्य देखील एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत. राजकारणात त्यांचा वारसा म्हणून गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना पुढे आणलं. धनंजय मुंडेंनी साऱ्या समाजांना बरोबर घेऊन काम करत हा वारसा सिद्ध केला. धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंप्रमाणे महाराष्ट्राचे, सर्व समाजांचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या कामकाजाचे व नेतृत्वाचे अनेक अनुभव सांगितले. तर गोपीनाथ मुंडेंनी त्या कालखंडात भाजपची बहुजनांचा पक्ष अशी ओळख निर्माण केल्याचंही एकनाथ खडसेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा”

काळजी घ्या! संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये आढळतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं

अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले…

राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

’14 तारखेला अनेकांचे मास्क उतरवणार’; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More