बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रालयात खळबळ! एकनाथ खडसेंना क्लीन चीट देणारा ‘तो’ अहवाल गायब

मुंबई | सध्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी चालू आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकली आहे. फडणवीस सरकारच्या काळात याच प्रकरणावरून त्यांना महसूल मंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. त्यात आता एकनाथ खडसे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

आपल्या पदाचा गैरवापर करुन पुण्यातील एमआयडीसीची जागा नातेवाईकांना दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर करण्यात आला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. तत्कालिन फडणवीस सरकारने नेमलेल्या या झोटिंग समितीचा अहवाल हा 2017 मध्येच आला होता. मात्र हा अहवाल कधी समोर आला नव्हता. या समितीच्या अहवालावरून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती.

एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत हा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. जेणेकरून त्यांच्यावर असलेले आरोप खरे आहेत की, खोटे हे जनतेला समजेल, असं खडसे यांनी म्हटलं होतं. पण फडणवीसांनी अहवाल सादर करणं निरर्थक असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहवाल मंत्रालयातून मागवला असता अहवाल गायब झाल्याचं उत्तर अजित पवारांना मिळालं आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांनी अहवाल गायब झाल्याचं अजित पवारांना सांगितलं आहे. हा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्यानं मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे. या झोटिंग समितीवर 45 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आता हा अहवाल गायब झाल्यानं एकनाथ खडसे यांच्या समस्या वाढू शकतात. हा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की, कुणी गायब केला?, असा सवाल आता विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून पुढील दोन-तीन दिवसात टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल – किशोरी पेडणेकर

वर्ल्डकप चॅम्पियन ‘यशपाल शर्मा’ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

‘चंद्राच्या हालचालीमुळे पृथ्वीवर येणार विनाशकारी संकट’; नासाच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका कमी; WHO ची माहिती

पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक; मुंडे भगिनींच्या भूमिकेकडे लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More