नाशिक महाराष्ट्र

एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!

जळगाव | माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी मु्क्ताईनगर न्यायालयाकडून अंजली दमानिया आणि प्रिती मेनन यांना पुन्हा दणका देण्यात आला आहे.

दमानिया आणि मेनन यांच्या विरोधात भाजप कार्येकर्ते रमेश ढोले यांनी मु्क्ताईनगर न्यायालयात IPC 499, 500 प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला होता.

दाखल करण्यात आलेला बदनामीचा खटला रद्द करण्यात यावा म्हणून अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायलयात अर्ज केला होता. मुक्ताईनगर न्यायालयातर्फे दमानिया यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील कामकाजाकरिता 26 फेब्रूवारी ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या तारखेला काय होत? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या माथेफिरु पूजा पांडेला अटक

-नगर लोकसभा जागेचं गणित काही जुळेना! राष्ट्रवादीचा प्रबळ दावा, विखे पाटील बंड करणार?

मोदींच्या ‘मन की बात’ला राहुल गांधी देणार टक्कर; घेऊन येणार ‘अपनी बात राहुल के साथ’

मराठमोळ्या स्मृती मंधानाचा ‘फोर्ब्स’ कडून गौरव

-राष्ट्रवादीचे आमदार आणि चंद्रकांत पाटलांचा एकत्रित विमानप्रवास! चर्चांना उधाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या