Top News महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना कोणतं पद देणार? जयंत पाटील म्हणाले…

मुंबई | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणतं पद द्यायचं याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार घेणार असल्याचं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

इतर पक्षाचे आमदार-खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असा प्रश्न जयंत पाटीलांना विचारला असता त्यावर ते म्हणाले की, “इतर पक्षाच्या आमदार-खासदारांना राष्ट्रवादीत प्रवेश कधी द्यायचा याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल”.

एकनाथ खडसेंचा शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. त्यांचा प्रवेश पक्षाच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती पुर्णपणे बरी आहे. मात्र त्यांना थोडीशी सर्दी असल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

विनयभंगाच्या तक्रारीतून खडसे अजून सुटलेले नाहीत- अंजली दमानिया

पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं खडसेंनी आत्मचिंतन करावं; गिरीश महाजनांचा टोला

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी भारताची तयारी सुरु; केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींची तरतूद

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या