जळगाव | भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील शाब्दिक युद्धाने जळगावातील राजकारण ढवळून निघत आहे. दोन्ही नेत्यांकडूंन आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना एकनाथ खडसेंनी महाजनांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ खडसेंची लायकी नसताना त्यांना भाजपमध्ये पदे मिळाली, अशी घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांबद्दलची धक्कादायक माहिती उघड केली आहे.
गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. गिरीश महाजनांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही?, असा खळबळजनक प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे. तर आपली लायकी आपणच ओळखायची असते दुसऱ्यांनी सांगायची नसते, अशी टीकाही खडसेंनी केली.
दरम्यान, माझ्या मागे लांगूलचालन लावणारा गिरीश महाजन माझ्या आशिर्वादाने मोठा झाला, असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांची हाजी हाजी करून महाजनांना नेतृत्व मिळालं. आतापर्यंत माझी हाजी हाजी करणारा महाजन याचं स्वत:चं नेतृत्व काय? अशी टीका देखील एकनाथ खडसेंनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजून सांगावं, नाहीतर…”
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
“हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही…”
“ब्राम्हण मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करावी लागेल”
“पवार कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळे…”
Comments are closed.