कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
जळगाव | कोरोना (Corona)महासाथीच्या रोगानं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला. अशातच आता कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात औषधी व रूग्णालय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
कोरोना काळात जळगाव जिल्ह्यात औषधी खरेदी व रुग्णालय साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी केला असून याबाबत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी देखील चौकशीची मागणी केल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भ्रष्टाचाराविषयी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र खळबळ उडालेली आहे.
थोडक्यात बातम्या –
“किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मी संपवणार”
“खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभाव”
CNG गाड्या वापरणाऱ्यांना मोठा झटका, ‘ही’ महत्त्वाची बातमी आली समोर
कोरोनाच्या नव्या लक्षणाविषयी WHOचा गंभीर इशारा, म्हणाले…
Health| पोटात गॅस तयार झाल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय
Comments are closed.