Top News

“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”

नवी दिल्ली |  आज फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबीनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी त्यांना टोमणा मारला आहे.

सत्तेसाठी पक्ष बदलणं माझ्या स्वभावात नाही. विरोधात असताना मलाही अनेक ऑफर आल्या. पण दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही, असं म्हणत खडसेंनी विखेंना टोला लगावला.

इतके वर्षात पक्षात झटलो आहे. 40 वर्ष आम्ही पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. दुसऱ्या पक्षात जाण्याचा कसा विचार करायचा, असं खडसे म्हणाले.

पक्षाची जमीन भुसभुशीत करण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे खडसे असले काय अन् नसले काही फरक पडत नाही, असं खडसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी

-आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक्त केली खदखद

-4 वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे आता राज्याचे 4 महिने कॅबीनेट मंत्री!

-फडणवीस मंत्रिमंडळात आयारामांना संधी; विद्यमान मंत्र्यांना डच्चू

-भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या