Eknath Shinde | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. सर्व उमेदवारांनी आपले अर्ज देखील भरले आहेत. त्यामुळे सध्या राज्यभर प्रचारसभा रंगताना दिसून येत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मोठ्या घोषणांची राज्यभर चर्चा रंगली आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली.
“1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरमधूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आता देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील 10 कलमं जनतेसमोर ठेवतो आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मोठ्या घोषणा केल्या.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या 10 मोठ्या घोषणा-
- राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाह 2100 रुपये मिळणार. पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
- प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
- वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
- जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
- राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
- 45 हजार पांदण रस्ते बांधणार. (Eknath Shinde )
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
- वीज बिलात 30 टक्के कपात.
- शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार. (Eknath Shinde )
News Title : Eknath Shinde 10 Big Announcements
महत्वाच्या बातम्या –
स्वामींच्या कृपेने आज कुणाची मनोकामना पूर्ण होणार?, वाचा राशीभविष्य
‘सलमान सोबतच्या वन नाईट स्टँडला कंटाळून…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं
चांदणी चौकातील समस्या कशी सुटली?, चंद्रकांत पाटलांनी शेअर केला व्हिडीओ