एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार आज गोव्यात दाखल होणार, राजकीय हालचालींना वेग
मुंबई | भाजपने महाविकास आघाडी सरकार अल्प मतात असल्याचे सांगत बहुमत चाचणी घेण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिले आहे. राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब करत तातडीने बहुमत चाचणी घेण्यासाठी उद्या (दि. 30 जून) रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यासंदर्भात राज्यपालांकडून विधानसभा अध्यक्षांना पत्रही गेले आहे.
बहुमत चाचणीसाठी गुवाहाटी येथे असलेला शिंदे गट उद्या मुंबईत येण्याची शक्यता होती. परंतु प्राप्त माहितानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आज गोव्यात जाणार आहे. गोव्यातील ताज कन्व्हेन्शन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आमदारांसाठी 71 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात राज्यपालांनी उद्या (दि. 30) रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हे सर्व आमदार गुवाहाटीवरुन मुंबईला न जाता गोव्याला का जात आहेत? यावरुन उलटसुलट चर्चाही सुरु आहेत.
राज्यात पावसाचे वातावरण असल्यामुळे विमानाच्या दळणवळणावर ऐनवेळी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या सकाळी 11 वाजता अधिवेशन आहे. तेव्हा ऐन वेळी धावपळ नको म्हणून शिंदे गटाने आज गोव्यात उतरण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, उद्या विधानभवनात बहुमत चाचणीत काय होणार? महाविकास आघडी सरकार टिकणार की पडणार? शिंदे-फडणवीस सरकार येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! राज्यपालांनी दिलेले ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट
“राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार येणार”; मोठी स्ट्रॅटेजी आली समोर
राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…
“संजय राऊत कालही महत्वाचे नव्हते आजही नाहीत, आता…”
“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”
Comments are closed.