सरकारचा मोठा निर्णय; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | राज्य सरकारने (State Goverment) मोठा निर्णय घेतलाय. याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरली जाणार आहेत.

आज सोन्याचा दिवस दिव्यांगांसाठी आहे. आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला दिव्यांग मागण्यांसाठी आंदोलन करावं लागलं नाही. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची आज मी घोषणा करत आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

आज जागतिक दिव्यांग दिन आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असला पाहिजे अशी आपली सगळ्यांची भावना होती.  हे राज्य सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू झालं आहे. या राज्यात लोकांच्या हिताचेच निर्णय होणार आहेत, असं त्यांनी यावेळी म्हटलंय.

बच्चू कडूंसारखा माणूस कधी खोके घेईल का? आरोपाची टीकेची सुद्धा स्पर्धा सुरू आहे, आरोपाला टिकेला उत्तर कामाने मिळणार आहे, असंही ते म्हणालेत.

खोके सरकार म्हणणाऱ्यांची डोके तपासण्याची गरज आहे. ज्या माझ्या दिव्यांग बांधवांना जमते ते तरी त्या रिकाम्या डोक्यावाल्यांना समजलं तर या राज्यात खूप मोठा बदल होऊन जाईल, असंही ते म्हणाले

महत्त्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe