बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता पण तुम्ही तर…’; एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई |  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा करतानाच शिंदे गटाला बाप पळवणारी टोळी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या  टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही तासांमध्ये दिल्लीतील भाषणातून उत्तर दिलं आहे.

आज राज्याच्या प्रमुखांनी मला मिंधे गट म्हटलं आहे. आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर कोण गेलं? मिंधेपणा कोणी केला हे सर्व महाराष्ट्र आणि देश बघतोय, असं शिंदे म्हणालेत.

त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही आता आसमान दाखवू. कोणाला तर आम्हाला आसमान दाखवणार. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला आसमान दाखवण्याची वेळ तुमच्यावर येणारच नाही, कारण आम्हीच तुम्हाला तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवलं आहे, असा टोला शिंदेंनी लगावला.

दरम्यान, आम्ही ढोकळा खायला लागलो अशी टीकाही त्यांनी केली. अरे पण आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो आहोत. म्हणून तर त्यांना ठेचलंय. ठेचा खाऊन मोठं झाल्यानेच आपल्या लोकांनी त्यांना ठेचलंय ना. महाविकास आघाडी खाली पाडण्याचं काम छोटं काम नव्हतं, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला आणखी एक झटका!

‘हो मी अनेकांना चुना लावला’; एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More