‘…असल्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
मुुंबई | शिवसेना मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचं भवितव्य धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांच्या संख्येत वाढ होत आहे. यावरुनच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सेनेकडून सूचक इशारा दिलाय. एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, असं पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आलं आहे.
यापत्रात असं नमूद करण्यात आलं आहे की या सर्व आमदारांनी पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करावं. यासंबधी शिवसेना खासदार अरविंद सांवत, नवनियुक्त गटनेते अजय चौधरी आणि काही आमदार यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली.
कोणाला घाबरण्याचा प्रयत्न करत आहात?, विधानसभा कामासाठी व्हिप लागतो बैठकीसाठी नाही. आमदाराविरोधात कारवाई करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. कारण आम्हीच खरी शिवसेना आहोत. संख्या नसताना तुम्ही गटनेता निवडला तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असं प्रत्युतर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.
आता यावर विधानसभेत काय निर्णय होईल?. 12 आमदारांना निलंबित केलं जाईल का? या राजकीय नाट्यात आता आणखी किती वळण येतील हे पाहणं रंजक ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या
‘…तर घर गाठणं कठिण होईल’, नारायण राणेंचा शरद पवारांना थेट इशारा
महिन्याभरानंतर केतकी चितळेची तुरूंगातून सुटका, बाहेर येताच म्हणाली…
खरंच चार्टर्ड प्लेनने आला होतात का?, ‘त्या’ फोटोंवर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवरून अजित पवारांचं भाजपला क्लिनचीट, म्हणाले…
‘घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चा होऊ शकते’; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन
Comments are closed.