Eknath Shinde l राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अशातच सर्व राजकीय मंडळींनी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. या निवडणुकीत तुम्ही गाफील राहू नका. कारण आपण सर्व कार्यकर्ते आहोत, एक-एक मत देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले आहेत.
कार्यकर्त्यांनो विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका :
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या ‘चारसो पार’च्या नाऱ्यामुळे महायुतीला जोरदार फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. अशातच आता शिक्षक आणि पदवीधर पदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही गाफील राहू नका. कारण आपण सर्व कार्यकर्ते आहोत, त्यामुळे एक-एक मत देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माझ्या एका मताने काय होणार आहे? कारण आपणच जिंकणार आहोत असा विचार करुन कोणीही गाफील राहता कामा नये. यासंदर्भात आम्ही पंतप्रधान मोदीजींसोबत 400 पारच्या घोषणेबाबत देखील बोललो आहोत.
महायुतीच्या या घोषणेमुळे कार्यकर्ते देखील रिलॅक्स झाले होते. मात्र आता तसं करायचं नाही. मोदीजी आता पंतप्रधानपदी बसलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणी कितीही जंग जंग पछाडले तरी मोदीजी त्यांच्यावर भारी पडणार आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या विजयसंकल्प मेळाव्यात बोलत होते.
Eknath Shinde l कोकण पदवीधर मतदारसंघात विजय आपलाच :
कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना कसलीही चिंता नाही, कारण विजय आपलाच आहे. महायुती म्हणून आपण ही निवडणूक मनावर देखील घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत कोकण हा महायुतीचा बालेकिल्लाच ठरलेला आहे, मात्र भिवंडी त्यासाठी अपवाद ठरला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवले, त्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत.
तसेच फेक नरेटिव्ह पसरवण्यात काही स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) यामध्ये हात होता. मात्र सगळ्याच स्वयंसेवी संस्था वाईट नाहीत. पण काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शहरी नक्षली घुसले आहेत. हे सर्वजण मोदी द्वेषाने पछाडलेले असल्याचे दिसत आहे. या NGO नी देखील मोदी हटावचा नारा दिला होता, मात्र असे काही झाले नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
News Title – Eknath Shinde Big Statement On Maharashtra Politics
महत्त्वाच्या बातम्या
आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात सावधानता बाळगावी
दान करते वेळी ‘या’ गोष्टी ठेवाव्या लक्षात, नाहीतर लागाल भिकेला
पुण्यात हादरून टाकणारी घटना, पत्नीला लॉजवर नेत पतीनेच केलं असं काही की..
‘एवढा जीव मला कुणीच लावला नाही’; वायबसे कुटुंबियांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
भारतीयांसाठी खूशखबर!!!, सौरभ नेत्रवलकर भारतात येऊन T20 वर्ल्डकप खेळणार