बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, म्हणून…”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळा गट स्थापल्याची अनेक कारणे सांगितली होती. आज त्यांनी त्याच संदर्भात पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे म्हणाले आम्ही आनंद दिघेंवर सिनेमा बनवला, तो महाराष्ट्राच्या जनतेला आणि प्रत्येक मराठी माणसाला आवडला. परंतु काही लोकांना तो आवडला नाही. कुणाला आवडो न आवडो मी त्याची पर्वा करत नाही, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

धर्मवीर आनंद दिघे साहेब (Dharmaveer Anand Dighe) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना गुरु मानलं होतं. आज आम्ही बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. आम्ही हा निर्णय का घेतला त्याचे आत्मपरिक्षण शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी केले पाहिजे. परंतु त्यापेक्षा ते आम्हाला गद्दार, बंडखोर असं म्हणत आहेत. हा बंड नव्हे, उठाव आहे, क्रांती आहे, असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आम्ही घेतलेला निर्णय हा लोकांना आणि शिवसेनेला वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडल्यापासून भरपूर लोक आम्हाला पाठींबा द्यायला येत आहेत. आम्ही रक्तांचं पाणी करुन, जीवाचं रान करुन, कष्ट घेऊन शिवसेना वाढवली. शिवसेनेसाठी आणि ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या. दिघेंनी उद्धवस्त होणारे आयुष्य वाचवलं, असं त्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर कामाख्या देवीने महाविकास आघाडी सरकारचा (MVA) बळी दिला. देवीला सुद्धा हे सरकार आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही. आषाढी एकादशीला पांडूरंगांची पूजा करण्याचा मान मिळाला. पंढरपूरात लोकांनी स्वागत केलं. आम्ही जी विचारांची आणि हिंदूत्वाची भूमिका घेतली त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, असं यावेळी मुुख्यमंत्री म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”

ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा

मातोश्रीचे पूर्वीचे दिवस गेले म्हणत मनसेची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘सुरूवातीलाच अशी ओढाओढ चिठ्ठ्या देणं सुरू झालं, पुढे पुढे तर…’; अजित पवारांची बोचरी टीका

‘एकनाथ शिंदेंनी तुम्हाला राजकीय कुबड्या दिल्या’, निलेश राणे दीपक केसरकरांवर बरसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More