मुंबई | ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडत होता. त्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतना धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करून शपथ घेतो असं म्हणाले होते. याच आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट सर्वांच्या भेटीला येत आहे.
आनंद दिघेंच्या भूमिकेत अभिनेते प्रसाद ओक असणार आहेत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीझरच्या अफाट यशानंतर मुंबईत चित्रपटाचा संगीताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली आहेत.
आनंद दिघे यांच्यासारखा लुक, देहबोली देखील दिघेंचीच, आवाजा सारखाच अशावेळी उपस्थितांना दिघे हे आपल्यात असल्याचा भास झाला. यावेळी प्रसाद ओक यांच्यात एकनाथ शिंदेना जणू आनंद दिघे हेच दिसले. शिंदे हे भर व्यासपिठावर ओक यांच्या पाया पडले. परिणामी उपस्थित देखील अवाक झाले होते.
दरम्यान, संगीत प्रकाशन सोहळ्यादरम्यान व्यासपीठावर सर्वजण फोटो काढण्यासाठी जमले असताना हा प्रसंग घडला. एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात आनंद दिघेंच महत्त्व अधोरेखित करणारा हा प्रसंग होता.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
भल्या भल्यांची दात तोडणाऱ्या टायसननं भर विमानात प्रवाशाला धु-धु धुतला; पाहा व्हिडीओ
“मी भ्रष्टाचार केला असेल तर फक्त…”, मंत्री हसन मुश्रीफांचं खुलं आव्हान
“छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचाही सहभाग”
“…जरा तारतम्य ठेऊन बोलावं”, अजित पवारांनी मिटकरींना फटकारलं
मोठी बातमी! राणा दांपत्याला मुंबई पोलिसांचा झटका
Comments are closed.