‘मंत्री करा, अन्यथा..’, ‘या’ आमदारासाठी शिंदे गटात सामूहिक राजीनाम्याची तयारी?

BMC Elections

Eknath Shinde | 23 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मागच्या रविवारी 15 डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजी नाट्य सुरू झालं आहे. अशात शिवसेना गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं टेंशन वाढवणारी माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात डावलल्याने त्यांचे समर्थक कमालीचे संतापले आहेत. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

तानाजी सावंत समर्थक नाराज-

इतकंच नाही तर, या प्रकरणी परंडा येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत तानाजी सावंत यांना मंत्री करा, म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्यास दोन दिवसात परंडा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा देखील देण्यात आलाय.

नुकत्याच झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या बैठकीत परंडा तालुक्यातील 25 सरपंच उपस्थित होते. यात तानाजी सावंत यांना मंत्री करा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची चिंता वाढली आहे. तानाजी सावंत देखील आजाराचे कारण देत अधिवेशन सोडून तडकाफडकी पुण्याला निघून गेले आहेत.

तानाजी सावंत यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह हटवलं-

यातच त्यांनी सोशल मीडियावर देखील नाराज असल्याचं दाखवून दिलंय. आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुक व इतर समाज माध्यमावरील धनुष्यबाणाचे चिन्ह हटवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला मी शिवसैनिक असं स्टेटस ठेवून त्यांनी उघड नाराजी जाहीर केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आमदार तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री होते. यंदाच्या मंत्री मंडळात देखील त्यांना मंत्री पद मिळण्याची आशा होती. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

News Title : Eknath Shinde group MLA Tanaji Sawant upset

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी, नागपुरात घडला धक्कादायक प्रकार

आज 12 पैकी कोणत्या राशीला मिळणार धन व समृद्धी?, वाचा राशीभविष्य

मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर थेट हल्लाबोल! जरांगे काय म्हणाले?

छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? भुजबळांचं सूचक विधान होतंय तुफान व्हायरल

“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .