Eknath Shinde | महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष हे मंत्रीमंडळ विस्तराकडे लागले आहे. फडणवीस सरकारमध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशात शिवसेना शिंदे गटात कुणाला संधी मिळणार, याची यादी समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये कुणाला संधी मिळणार, याबाबत दावा करण्यात आला आहे. (Eknath Shinde)
महायुतीमध्ये शिवसेनेला 13 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात शिवसेनेचे 10 ते 12 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. (Eknath Shinde)
शिंदे गटाचे संभाव्य मंत्री-
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दिपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे
१२) प्रकाश सुर्वे
१३) आशिष जैस्वाल
यासोबतच एकनाथ शिंदे हे आपल्या 57 आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न वापरणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. इच्छूक आमदारांची नाराजी थोपवून धरण्यासाठी अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रीपदे देण्याचा तोडगा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला असल्याचं बोललं जातंय. मात्र, यासंदर्भात अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. (Eknath Shinde)
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला एकूण 12-13 मंत्रिपदे तसेच भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांच्या वाट्याला 21 ते 22 मंत्रिपदे जाणार असल्याचं म्हटलं जातंय.
News Title – Eknath Shinde Group Potential Ministers
महत्वाच्या बातम्या-
“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे संतापले, पण कुणावर?
मोक्षदा एकादशीला भगवान विष्णू व लक्ष्मी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी!
मंत्रिमंडळात कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी दिल उत्तर
असली उंदर पवारसाहेब… पडळकर- खोतांच्या जहरी टीकेला ‘या’ नेत्याचं प्रत्युत्तर