‘राज्यसभा निवडणुकीत मी पराभूत झालो असतो तर…’; राऊतांचं मोठं वक्तव्य
मुंबई | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री. त्यानंतर राजकीय क्षेत्रातल्या बऱ्याच मान्यवर आणि नेत्यांनी यावर भाष्य केलं. खरं तर या युतीमध्ये भाजप मोठा पक्ष असूनही फडणवीसांना दुय्यम पद दिलं गेलं. यामागे कारणं काय? भाजपच्या केंद्रीय नेत्यांचं राजकारण?, अशा अनेक चर्चांना उधाण आलं. यावर आता शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसेच भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी यावेळी बोलताना सडकून टीका केली.
शिंदे गटाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण चूक केली आहे, आपण फसलो आहोत, हे लक्षात आल्यामुळे बंडखोर गटाकडून असे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, हे काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ईडीने काल तब्बल 10 तास संजय राऊत यांची चौकशी केली. यावर बोलताना राऊत म्हणाले, काल मला भाजपच्या एका शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं. माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता. मात्र मी ईडीच्या चौकशीला सामोरे गेलो. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी बॅग भरुन आलो आहे, असं ईडी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं राऊत म्हणाले.
राज्यसभा निवडणूकीत मला पाडण्याचे प्रयत्न झाले. मी पराभूत झालो असतो तरी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ही दोन्ही नावे एकाच नाण्याच्या बाजू, असंही संजय राऊत म्हणालेत.
थोडक्यात बातम्या –
“शासकीय पूजेनंतर महिन्याभरात शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार”
2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस
‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा मोठा खुलासा
‘भविष्यात असे प्रकार…’; टेबलवर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”
Comments are closed.