बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा!

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज 23 दिवस उलटून गेले आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसला तरी विकासकामांच्या घोषणा झाल्या आहेत. सत्तेत आल्यापासून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी कामाला जोर देऊन अनेक घोषणा केल्या आहेत. यातच आता एकनाथ शिंदेनी मुंबईकरांसाठी एक नवी घोषणा (Declaration) केली आहे.

पाऊस चालू झाला की मुंबईकरांना पावसाळ्यात खड्यांचा त्रास होतो. अनेकांची या खड्यांमुळे हाडे खिळखिळी होत आहेत. यामुळे येत्या दोन वर्षात मुंबई आणि आसपासच्या परिसरातील रस्ते खड्डेमुक्त (pit free) करून सिमेंटचे करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या 2 वर्षात मुंबईकर खड्डेमुक्त पावसाळ्याचा आनंद घेतील.

मुंबईतील रस्ते सिमेंट काॅंक्रिटीकरणाच्या कामाला वेग आला असून सगळे रस्ते लवकरात लवकरच खड्डेमुक्त होतील, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबतच्या बैठकीत महानगरपालिका (Municipal Corporation) आयुक्त डाॅ चहल यांनी सादरीकरण केले.

2023-24 मध्ये 423 किलोेमीटर रस्त्याची सिमेंट काँक्रिटीकरण काम हाती घेणार आहोत. सध्या 236 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी 200 हजार कोटी 200 रुपये इतका खर्च होत आहे. तसेच ठराविक अंतरांवर पाण्याचा निचरा (Drain) होण्यासाठी शोषखड्डेही असतील,असंही त्यांनी बैठकीत सांगितलं. रस्त्याची होत असलेली कामे आणि सुधारणा यांचा आढावा मुुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. पावसामुळे झालेले खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार

‘शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल’, संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले

‘शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं कारण…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नीरज चोप्राचा चंदेरी विजय, वर्ल्ड चँपियनशिपमध्ये रचला नवा इतिहास

येत्या तीन महिन्यात मध्यावधी निवडणुका लागणार?, रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More