बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार येणार”; मोठी स्ट्रॅटेजी आली समोर

मुंबई | महाविकास आघाडी सरकार उद्या विधानभवनात बहुमत चाचणी देणार आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या (30 जून) रोजी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गट उद्या बहुमत चाचणीसाठी गुवाहाटीवरुन मुंबईत दाखल होणार आहे. तत्पुर्वी ते गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिरात गेले असून तिथे त्यांनी महाराष्ट्राच्या सुख आणि समाधानासाठी प्रार्थना केली आहे.

महाराष्ट्रात 3 जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. शिवसेना-भाजप सरकार स्थापम करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने नवी स्ट्रॅटेजी तयार केल्याची माहिती समोर येत आहे.

आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना अशी भूमिका बंडखोर आमदारांचा गट घेणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होऊन, खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगापुढे पुढील काही वर्षे चालु राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे समजते.

दरम्यान शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारचे इतर दोन घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अजून आपली कोणतीही भुमिका किंवा स्ट्रॅटेजी स्पष्ट केली नाही. उद्या महाविकास आघाडी सरकार पडणार की टिकणार यावर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात बातम्या –

“संजय राऊत कालही महत्वाचे नव्हते आजही नाहीत, आता…”

“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”

भाजपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, म्हणाले…

ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, 30 तारखेला सरकारची बहुमत चाचणी

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More