एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांकडून सर्वात महत्त्वाची अपडेट!

Eknath Shinde | काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे सातऱ्यातील दरे गावात आरामासाठी गेल्याचं समोर आलं. दरम्यान, शिंदेंची प्रकृती खालवली असल्यानं त्यांच्या डेंग्यू मलेरियाची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

घशाचा संसर्ग-

दरम्यान, शिंदेंना (Eknath Shinde) काही वेळापूर्वी ज्यूपटिर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांना घशाचा संसर्ग झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. शिंदेंना गिळताना त्रास होत असताना सांगण्यात आलं, त्यामुळे रुग्णालयात दाखल करताच डाॅक्टरांनी घशाचा संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे.

या बरोबरच एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

शिंदेंवर उपचार सुरू-

दरेगाववरुन दोन दिवसांत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाणे येथील निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली नाही. आता जुपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॉक्टरांनी सांगितलं. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे.

News Title : eknath shinde health update

महत्त्वाच्या बातम्या-

नवीन मुख्यमंत्री कोण होणार? संजय शिरसाट यांनी दिली माहिती

लाडक्या बहिणींनो 2100 रुपये कधीपासून मिळणार?, मोठी अपडेट समोर

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते? MPSC च्या पत्रिकेत अजब प्रश्न; पर्याय वाचून तुम्हीही विचारात पडालं

स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?

अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार