सर्वात मोठी बातमी! राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली

Eknath Shinde | राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी साताऱ्याला गेले आहेत. सत्तास्थापनेची गडबड सुरू असताना ते अचानक गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. पण आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज त्यांना कोणालाही भेटता येणार नाही, असं समजतंय.

काय घडलं नेमकं?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत आधीच काहीशी ठीक नसल्यानं त्यांनी मुंबईतून गावाला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या गुरुवारी मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर शिंदेंनी अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी ते हेलिकॉप्टरनं गावी पोहोचले. पण आता त्यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याची माहिती माध्यमांकडून समोर येत आहे.

शिंदेेंना काय झालं?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना किरकोळ ताप आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे आज आपल्या दरे गावातच विश्रांती घेणार आहेत. त्यामुळे ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदेंची प्रकृती बिघडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन कोणतेही मतभेद नाही. लाडका भाऊ हे पद मला कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आपणास मान्य राहणार असल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते.

News Title : eknath shinde health update

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहळांची चर्चा; ट्विट करत म्हणाले…

महागाईचा भडका! ‘या’ साबणांच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

एकीकडे एक्स नवऱ्याची हळद तर दुसरीकडे….; समंथा प्रभूवर दु:खाचा डोंगर

धाकधूक वाढली! ‘या’ मतदारसंघाची पुन्हा मतमोजणी होणार?