विनोद कांबळींच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे सरसावले, दिलं मोठं आश्वासन

Eknath Shinde helped Vinod Kambli treatment

Vinod Kambli | माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती सध्या अस्वस्थ आहे. त्यांच्यावर भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या कांबळी यांच्याकडे पेन्शन व्यतिरिक्त उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नसल्याने त्यांच्या उपचारासाठी देखील बराच खर्च लागतोय. अशात उपचारावर होणारा एवढा खर्च कुठून करायचा, याची त्यांना चिंता होती. मात्र, कांबळी यांच्या मदतीसाठी अनेकजण धावले आहेत. यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मदतीचा हात पुढे केलाय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशानूसार त्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी कांबळी यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कशाचीही कमी पडू नये याची काळजी घ्या, अशा सूचना देखील दिल्या.

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विनोद कांबळींना वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना अजून मदत करण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.

या मदतीसाठी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी शिंदे पिता-पुत्राचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी एकदा हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी यावं अशी विनंती देखील केली. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे विनोद कांबळी यांची भेट घेणार आहेत.

विनोद कांबळी यांना नेमकं काय झालंय?

मिळालेल्या माहितीनुसार, विनोंद कांबळींच्या (Vinod Kambli ) मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी आढळून आल्या आहेत. त्यांच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत.विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचं समोर आलंय. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.

विनोद कांबळींची कारकीर्द

1991 साली विनोद कांबळी (Vinod Kambli ) यांनी क्रिकेट जगतात पाऊल ठेवले. 1991 साली त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1993 साली त्यांनी कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. 2000 च्या दशकात विनोद कांबळी यांचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला.त्यामुळे 2000 सालानंतर टीम इंडियात त्यांना स्थान मिळाले नाही. विनोद कांबळी 2000 साली शारजाहमध्ये शेवटची मालिका खेळले होते.

News Title : Eknath Shinde helped Vinod Kambli treatment

महत्वाच्या बातम्या –

देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव, मनातील इच्छा देखील होतील पूर्ण!

तुम्हाला प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती?; चौकशी दरम्यान अल्लू अर्जूनचा खुलासा

पुणे-नगर रस्ता नव्हे हा तर ‘मृत्यूचा महामार्ग’; वर्षभरात एवढ्या लोकांनी गमावले प्राण!

क्रिकेटपटू, उद्योगपती, अभिनेता…कोणालाच नाही सोडलं; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरनं खळबळ!

महाराष्ट्राला हादरवणारा खुलासा समोर; माजी जिल्हाधिकाऱ्यांनी उघड केले काळे कारनामे

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .