एकनाथ शिंदे ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता; महत्त्वाची माहिती समोर
मुंबई | विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला असला तरी आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेमध्ये रात्रभर जोरबैठका सुरू होत्या. त्यानंतर अचानक एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे थेट गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 शिवसेनेचे आमदार आहे. धक्कादायक म्हणजे, विधान परिषदेत मतदान सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची जुळवाजुळव सुरू केली होती.
सर्व आमदारांना शिंदेंनी फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे.
थोडक्यात बातम्या
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?, विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! फडणवीसांची रणनिती यशस्वी, महाविकास आघाडीचे मतं फोडण्यात भाजपला यश
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनिया गांधींना ईडीकडून समन्स जारी
केंद्रीय निवडणूक आयोगाचाही काँग्रेसला दणका, मतमोजणीला सुरूवात
“कोणी कितीही पावसात भिजलं तरी निवडून येणार नाही”
Comments are closed.