Eknath Shinde | अखेर 11 दिवसांनी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय लागलाय. विधानसभेत भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालंय. त्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. दरम्यान, (04 डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली आहे. त्यामुळे उद्या (05 डिसेंबर) रोजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यावेळी कोणकोण मंत्री शपथ घेणार आहेत? त्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटाचे कोणते नेते शपथ घेणार?
महायुतीची पत्रकार परिषद झाल्यानंतर फडणवीस आणि शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली. यावेळी शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, उद्य सामंत, शंभूराज देसाई या चार महत्त्वाच्या नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. दरम्यान, गृहखातं आपल्याला मिळावं अशी मागणी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मात्र, भाजप हे खातं सोडण्यास तयार नाहीत. आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यंत्री असताना त्यांना गृहखातं आपल्याकडे ठेवलं होतं. त्यामुळे आता शिंदे हे उपमुख्यमंत्री होत असल्याने त्यांना देखील हे खातं मिळावं, अशी शिवसेनेची मागणी आहे.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार?
फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच इच्छा आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
News Title : eknath shinde list of people to get post of minister
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी अमित शाहांना…’; अजित पवारांनी केला मोठा खुलासा
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?, फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं
‘मी तर घेणारे शपथ, मी काय थांबणार नाही’; अजित पवारांच्या वक्तव्याने सगळे खळखळून हसले
मोठी बातमी! महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा
पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!