कांदा उत्पादकांसाठी एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा!

मुंबई | कांदा उत्पादकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने 200 आणि 300 रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल 300 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

दरम्यान, मागच्या काळात चक्रीवादळ आले होते, त्यावेळी पैसे दिले नव्हते, त्यामुळे राजकीय बोलू देऊ नका. यावर कोणतेही राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली सगळी माहिती दिली आहे. या नुकसानीबद्दल तत्काळ मदत दिली जातील. एक गोष्ट मदत आहे, विरोधी पक्षांना फक्त शेतकऱ्यांच्या मुद्यावर राजकारण करायचं आहे. हे मगरीचे अश्रू आहे, असं म्हणत शिंदेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-