बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळ विस्तार पुढच्याच आठवड्यात?, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…

मुंबई | महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंबंधी चर्चा केली. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या विकास कामांसाठी सुद्धा पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन पुढील आठवड्यात राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाईल. आपण मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पुर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे मध्यावधी निवडणूका होतील, असे म्हणत असले, तरी आमचे सरकार मजबूत आहे. आम्हाला 164 आमदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधकांजवळ केवळ 99 आमदार आहेत.

महाविकास आघाडी सरकार पाडत शिंदे यांनी विश्वासघात केल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळून लावला. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालत आहोत. आम्हाला त्यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे शिकवले. ही गद्दारी नाही तर हा उठाव आहे, असं देखील शिंदे म्हणाले. संजय राऊत करत असलेेले आरोप बिनबुडाचे आहेत. आम्ही अनेकदा उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. आमची भाजपसोबत जाण्याची मागणी त्यांना सांगितली होती. परंतु आम्ही त्यांचे मन वळवू शकलो नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, दिल्लीवारीत शिंदे-फडणवीस जोडीने राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. त्यावेळी त्यांच्यात खातेवाटपावरुन दिर्घकाळ चर्चा झाली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ते पंढरपूरला रवाना झाले.

थोडक्यात बातम्या –

श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा, नारायण मुर्तींसोबत आहे खास नातं

“शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीसांनी दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असतील”

भाजप नेत्याचा मोठा दावा, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More