महाराष्ट्र मुंबई

गेल्या 5 वर्षातील सर्व अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील- एकनाथ शिंदे

मुंबई | गेल्या 5 वर्षात दाखल करण्यात आलेले सर्व अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील, असा शब्द राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबतही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल 4 तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. वेगवेगळ्या प्रकल्पांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं, याबाबत विचारविनीमय झाला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

राज्यात गेल्या पाच वर्षात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. गुन्हे मागे घेताना कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहिलं जाणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, खोट्या गुन्ह्यांमध्ये कोणी विनाकारण अडकलं असेल तर त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करेल, असं राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या