बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”

मुंबई | मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणारा पाऊस बघता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनेच्या सर्व विभागांशी चर्चा करण्यात आली आहे. आर्मी, एनडीआरएफ, एअर फोर्स याच्यांशी संवाद साधण्यात आला. दरडग्रस्त विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच कोणतीही जीवीत-वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत, असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर नागरिकांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेचं नुकसान होणार नाही यासाठी राज्यसरकार तयार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, जे राज्याच्या हिताचं आहे, जे लोकांच्या हितासाठी आहे तेच राज्यसरकार करेल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिलं आहे.

थोेडक्यात बातम्या

राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…

‘…तर महाविकास आघाडी स्थापन करण्याची गरज नसती पडली’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, रौप्य पदकावरही कोरलं नाव

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी केला ‘हा’ नवा संकल्प

‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…’, शिंदे सरकारमध्ये शहाजी पाटलांना मंत्रीपद मिळणार ?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More