बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तरीही माझ्यातला शिवसैनिक जिवंत असेल’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

ठाणे | बहुमत चाचणी प्रस्तावात शिंदे सरकारला 164 मते मिळाली. बहुमत चाचणीनंतर भाजप (BJP) आणि शिंदे गट अधिकृतपणे सत्तेत आला.  त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चैतमन्यभूमीवर डाॅ. बाबासाहेव आबेंडकर, शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यात आनंद दिघे यांना वंदन केलं. आनंदवनात आनंद दिघेंच्या स्मृतीला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला.

सोबत असलेल्या 50 आमदारांपैकी एकही आमदार मागे हटला नाही कारण मी दिलेला शब्द पाळतो, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी हिंदी चित्रपटातील डायलाॅग बोलून दाखवला. ‘एकबार मैने कमिटमेंट करदी तो अपने आप की नही सुनता…’ अशी तुफान डाॅयलागबाजीही एकनाथ शिंदेंनी यावेळी केली. तर अन्यायाविरूद्ध पेटून उठा, असं दिघेसाहेब सांगायचे. अन्याय होत असेल तर सहन करू नका, असं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackery) सांगायचे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, त्यांचे हिंदुत्वाचे विचार, त्यांची भूमिका आणि दिघे सांहेबांची शिकवण यामुळे आम्ही अन्यायाविरूद्ध लढा उठवला आहे बंड केलं नाही, असं शिंदे म्हणाले.

बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशिर्वादाने मी आज मुख्यमंत्री झालोय. पण मी अजूनही एक कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहीन असं ते म्हणाले. मी कितीही मोठा झालो तरी माझ्यातला शिवसैनिक जिंवत असेल. यामुळेच याची नोंद साऱ्या इतर देशांनी घेतली. 33 पेक्षा जास्त देशांनी घेतली. त्यांनाही जाणून घ्यायचे आहे एकनाथ शिंदे (Eknath shinde) कोण आहे? असं वक्तव्य देखील एकनाथ शिंदेंनी केलं.

राज्याचा विकास करा आम्ही तुम्हाला हवी ती मदत करू असा शब्द मला पंतप्रधाऩ नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री (Home Minister) अमित शहांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मोठपणा दाखवला आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं. बाळासाहेबांनी कधीही काँग्रेस राष्ट्रवादीला कधीही जवळ केलं नाही. त्यांनी हिंदुत्वासाठी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच हे मोठं धाडस केलं, असा टोलाही शिंदेंनी शिवसेनेला लगावला.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More