महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार?, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Eknath Shinde | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता आठवडा उलटला आहे. मात्र, अजूनही महायुतीने सत्ता स्थापनेसाठी मुहूर्त काढला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेबद्दल सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिल्लीत  झालेल्या बैठकीनंतर तर अनेक चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) हे नाराज असल्याचं बोललं जातंय.

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत भाजपाचे प्रमुख नेते अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कोणती खाती मिळणार यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, मुख्यमंत्री पदाचाही पेच सुटल्याचं बोललं जातंय.

एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार?

एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडे गृहखात्याबाबत आग्रह केलाय. मात्र, भाजपा हे खातं सोडण्यास तयार नसल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून उपमुख्यमंत्रीपद किंवा मग केंद्रात मोठं पद असे दोन प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. दोन्हीपैकी काय ते एकच पर्याय शिंदे यांना निवडावा लागणार आहे. मात्र, शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात रस असल्याची भूमिका व्यक्त केलीये. दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर महायुतीची काल (29 नोव्हेंबर) मुंबईत देखील महत्वाची बैठक होणार होती.

मात्र, ही बैठक टाळून शिवसेना नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)थेट दोन दिवसांच्या मुक्कामासाठी साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. पत्रकारांशी कोणताच संवाद न साधता एकनाथ शिंदे अचानक गावी निघून गेल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं एक वक्तव्य देखील चर्चेत आलंय.

संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

आमदार संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांच्या गाव दौऱ्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावर “राजकीय पेचप्रसंग आला, विचारासाठी वेळ हवा असेल तर ते त्यांच्या गावाला प्राधान्य देतात. ते दरे गावात जातात, तिथे त्यांचा फोन वगैरे लागत नाही.” असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“आरामात, विचार करून मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते दरे गावात जातात. आज सायंकाळपर्यंत ते मोठा निर्णय नक्कीच घेतील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या हालचालींबाबत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलंय. आता आज (30 नोव्हेंबर) एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title :  Eknath Shinde preparing to take a big decision

महत्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे राज्यातील थंडीचा जोर वाढणार

महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?

“आंबेडकरी समाज दुःखात बुडालेला असताना…”; शपथविधीबाबत ‘या’ नेत्याची मोठी मागणी

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला, मुख्यमंत्र्यांसह ‘या’ 20 जणांचा होणार शपथविधी?