नवी दिल्ली | गट तयार करून 12 खासदारांचं पत्र लोकसभा अध्यक्षांकडे दिलं. तसेच ओबीसी आरक्षाबाबत वकिलांशी चर्चा केल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे आज दिल्ली दोऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
जी भूमिका आम्ही 50 आमदारांनी घेतली त्याचं समर्थन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलं तसेच जनतेनंही केलं. अडिच वर्षांपूर्वी व्हायला हवं ते सरकार आम्ही स्थापन केलं. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय, असं ते म्हणालेत.
आम्ही चांगले निर्णयही घेतले. तसेच केंद्र सरकारचंही महाराष्ट्र सरकारला समर्थन आहे. त्यांनी विकासासाठी काहीही कमी पडू न देण्याचं आश्वासन दिलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
“माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा”
“बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं”
“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरुण सरदेसाईंना मोठा धक्का!
Comments are closed.