नक्की मुख्यमंत्री कोण?; शिंदेंनीच फडणवीसांचा केला ‘लाडके मुख्यमंत्री’ उल्लेख
मुंबई | शिंदे गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केली जाते.
आता तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलं आहे. यामुळे आता विरोधकांच्या हातात आयतं कोलित सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ राजकीय वर्तुळात वेगाने व्हायरल होतोय.
एका भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांनी राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी.. असा उल्लेख केला. शिंदे यांच्या या वक्तव्याने विविध चर्चांना उधाण आलंय.
गोरेगाव येथील कोकण महोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.
राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पाहत नसून ते उपमुख्यमंत्री आहेत अन् देवेंद्र फडणीवस हे मुख्यमंत्री आहेत, असे टोमणे वारंवार विरोधकांकडून लगावले जातात.
महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
- भाजप मंत्र्याच्या अडचणीत वाढ; लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा चर्चेत
- शिंदे-फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा!
- 1 रुपयाच्या शेअरचा मोठा धमाका; गुंतवणूकदार झाले करोडपती
- कॅनरा बँकेच्या ग्रहकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ नियमात झाला बदल
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून अजित पवारांचा अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.