Eknath Shinde l राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार? याबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे अशातच विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे उद्या 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदेंकडून नारळ दिला जाणार :
मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी इच्छुक आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत. तसेच यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुद्धा आहेत. तसेच मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेनेचे इच्छुक आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. त्यामुळे आता मंत्रिपद मिळवण्यासाठी राज्यातील आमदारांच जोरदार लॉबिंग सुरु आहे.
याशिवाय शिवसेना यावेळी नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळत आहे. तसेच अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना एकनाथ शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती देखील पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
Eknath Shinde l मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार लॉबिंग सुरु :
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय शिरसाट, विजय शिवतारे, योगेश कदम, भरत गोगावले आणि बालाजी किणीकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागच सरकार स्थापन झालं अगदी तेव्हापासून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा आहे.
मात्र यंदाच्या वर्षी तरी मंत्रिपद मिळावे असा दोघांचा प्रयत्न आहे. तसेच या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांना भेट नाकारल्याच बोललं जात आहे. याशिवाय हे दोन्ही आमदार मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ जोरदार लॉबिंग करत आहेत.
News Title – Eknath Shinde refuse to meet Deepak Kesarkar & tanaji sawant
महत्त्वाच्या बातम्या-
कागदाच्या कपात चहा पिताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकतो ‘हा’ आजार
सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट
“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण
मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली, दिल्लीत उपचार सुरू
भुजबळ ते धनंजय मुंडे.., राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?