मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरुण सरदेसाईंना मोठा धक्का!
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेला एकामागे एक धक्केच देत आहेत. ही धक्क्यांची मालिका थांबायचं नाव घेत नाही आहे. कधी आमदार फुटी, कधी नगरसेवक फुटी तर कधी खासदारांची चलबिचल, असे सतत एकामागे एक धक्के शिवसेनेला बसत आहेत. आता शिवसेेनेच्या युवासेना राज्य सचिवांची (Yuvasena State Secretary) आता शिंदे गटाने उचलबांगडी केली आहे.
शिवसेनेचे युवासेना राज्य सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांना शिंदे गटाकडून पदावरुन हाकलण्यात आलं आहे. त्यांच्या जागी शिंदे गटाच्या किरण साळी (Kiran Mali) यांची नियुक्ती केली गेली आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि युवासेनाप्रमुख वरुण सरदेसाई यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. शिंदे गट धाकदपटशाही करुन, वेगवेगळी आमिषे दाखवून, ईडी आणि इतर तपास यंत्रणांची भीती दाखवून शिवसेनेच्या लोकांना आपल्या गटात सामिल करुन घेत आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला.
शिवसेनेतील सहा खासदार सोडले तर इतर खासदार शिंदे यांच्या साम्राज्यात विलीन होण्याकरीता मोर्चेबांधणी करुन तयार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला जगावं, की मरावं असा एकच गहन प्रश्न पडला आहे. शिवसेना जर अशा प्रकारे एक एक करुन बंडखोरांवर कारवाई करत राहीली तर शिवसेनेकडे तळागाळातील शिवसैनिकांशिवाय दुसरे कोणीच उरणार नाहीत.
सध्या देशात भाजपचे नाणे चलतीत आहे. अशा वेळी पुन्हा शू्न्यातून पक्ष उभा करणे, रीक्त जागांवर नवा चेहरा तयार करणे आणि आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणे शिवसेनेला जड जाणार आहे. त्यात शिंदे गट शिवसेनेला रोज नवा अध्याय देतच आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचे भवितव्य काय? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका
एकीकडे पूरग्रस्तांचे हाल तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरूये- आदित्य ठाकरे
राष्ट्रपती निवडणुकीत ‘त्या’ आमदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका!
शिवसेना खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे मोदींना भेटणार?, फक्त हे 6 खासदार ठाकरेंसोबत!
कोरोनानंतर आता डेंग्यूचा शिरकाव; ‘ही’ लक्षणे आढळल्यास ताबडतोब हॉस्पिटल गाठा
Comments are closed.